माहितीचा अधिकार (RTI) – ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे

माहितीचा अधिकार (RTI)

ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे

“पारदर्शी, गतिमान आणि उत्तरदायी प्रशासन”

Public Information Officer

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी

जनमाहिती अधिकारी

📍 ग्रामपंचायत कार्यालय, चिंचोली शिंगणे

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

✉️ gpchincholishingne@email.com

Appellate Authority

मा. गटविकास अधिकारी सो.

प्रथम अपिलीय अधिकारी

📍 पंचायत समिती कार्यालय, अंजनगाव सुर्जी

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

✉️ bdoanjangaon@gmail.com

ℹ️ माहितीचा अधिकार अधिनियम २००५

शासकीय कामात पारदर्शकता यावी आणि नागरिकांना प्रशासनातील माहिती मिळावी यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.

  • उद्देश: भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक कारभार.
  • वेळमर्यादा: अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे.
  • अपवादात्मक स्थिती: जीविताशी संबंधित माहिती असल्यास ४८ तासात देणे बंधनकारक आहे.

📝 अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. साध्या कागदावर जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने अर्ज करावा.
  2. अर्जासोबत रु. २०/- चा कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन पावती जोडावी.
  3. दारिद्र्य रेषेखालील (BPL) अर्जदारांना शुल्क माफ आहे (BPL कार्ड प्रत जोडणे आवश्यक).
  4. अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून त्याची पोचपावती घ्यावी.

📊 मागील ३ वर्षांचा RTI अहवाल

वर्ष प्राप्त अर्ज निकाली काढलेले प्रलंबित शेरा
२०२५-२६ १२ १२ ०० निरंक / पूर्ण
२०२४-२५ ५२ ५२ ०० पूर्ण
२०२३-२४ ४५ ४५ ०० पूर्ण
Scroll to Top