माहितीचा अधिकार (RTI)
ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
“पारदर्शी, गतिमान आणि उत्तरदायी प्रशासन”
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
जनमाहिती अधिकारी📍 ग्रामपंचायत कार्यालय, चिंचोली शिंगणे
ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
✉️ gpchincholishingne@email.com
मा. गटविकास अधिकारी सो.
प्रथम अपिलीय अधिकारी📍 पंचायत समिती कार्यालय, अंजनगाव सुर्जी
ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
✉️ bdoanjangaon@gmail.com
ℹ️ माहितीचा अधिकार अधिनियम २००५
शासकीय कामात पारदर्शकता यावी आणि नागरिकांना प्रशासनातील माहिती मिळावी यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.
- उद्देश: भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक कारभार.
- वेळमर्यादा: अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे.
- अपवादात्मक स्थिती: जीविताशी संबंधित माहिती असल्यास ४८ तासात देणे बंधनकारक आहे.
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया
- साध्या कागदावर जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने अर्ज करावा.
- अर्जासोबत रु. २०/- चा कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन पावती जोडावी.
- दारिद्र्य रेषेखालील (BPL) अर्जदारांना शुल्क माफ आहे (BPL कार्ड प्रत जोडणे आवश्यक).
- अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून त्याची पोचपावती घ्यावी.
📊 मागील ३ वर्षांचा RTI अहवाल
| वर्ष | प्राप्त अर्ज | निकाली काढलेले | प्रलंबित | शेरा |
|---|---|---|---|---|
| २०२५-२६ | १२ | १२ | ०० | निरंक / पूर्ण |
| २०२४-२५ | ५२ | ५२ | ०० | पूर्ण |
| २०२३-२४ | ४५ | ४५ | ०० | पूर्ण |

